YES Bank | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा, देश सोडून जाण्यावर बंदी

About Me

YES Bank | येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या घरावर ईडीचा छापा, देश सोडून जाण्यावर बंदी


yes bank rana kapoor

येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या वरळीतील समुद्र महल घरावर इडीचा छापा टाकला मनी लाँड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  राणा कपूर यांच्यावर वारेमाप कर्जवाटप केल्याचा आरोप आहे , व त्यांच्यावर लुक आऊट नोटिस बजावण्यात आली आहे , त्यामुळे कपूर यांना देश सोडून कोठेही जाता येणार नाही


डीएचएफएल कंपनीला कर्ज देण्याच्या बदल्यात फायदा मिळवल्याचा गंभीर आरोप यांच्यावर करण्यात आला आहे.


 राणा कपूर यांनी येस बँकेद्वारे आपल्या अधिकारात नियमबाह्य कर्ज वाटप केलं आहे. कर्ज वाटप करणे आणि ते वसूल करण्याची प्रक्रियाही त्यांनी ठरवली. आपल्या वैयक्तिक संबंधातून हे कर्ज वाटप केल्याचं समोर आलं आहे. 2017 मध्ये राणा यांनी जवळपास 6355 कोटींची कर्ज वाटप केल्याचं उघड झालं आहे.
राणा कपूरचा नीरव मोदींच्या बिल्डिंगमध्ये फ्लॅट


वरळीच्या समुद्र महल बिल्डिंगमध्ये राणा कपूर यांचा प्लॅट आहे. या बिल्डिंगमध्ये देशातील अनेक व्यावसायिक,
मोठ्या कंपन्यांचे सीईओ राहतात. पीएनबी बँक घोटाळ्याचा आरोपी नीरव मोदीचाही या बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहे. या समुद्र महल बिल्डिंगमधील फ्लॅट
1 लाख स्क्वेअर फूटाने विकला गेला होता, त्यावेळी ही बिल्डिंग चर्चेत आली होती.