KBC 11 : |कौन बनेगा करोडपती मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करा

About Me

KBC 11 : |कौन बनेगा करोडपती मधे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानप्रकरणी अमिताभ बच्चन यांच्यावर गुन्हा दाखल करा


insulting Chhatrapati Shivaji Maharaj

कौन बनेगा करोडपती या सोनी टिव्ही कार्यक्रमात शिवाजी महाराजांचा अपमान केल्या प्रकरणी कार्यक्रमाचे दिग्दर्शक , निर्माता, व अमिताभ बच्चन, यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी संभाजी बिग्रेडने पुण्यात केली आहे. व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये अर्ज देण्यात आला आहे आणि सोशल मीडियावर सोनी वाहिनिचा निषेद केला जात आहे.सविस्तर माहिती अशी की कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात एक प्रश्न विचारण्यात आला  “'इनमे से कोनसे शासक मुगल सम्राट औरंगजेब के समकालीन थे'...?”  या  प्रश्नाला चार पर्याय देण्यात आले होते त्यात  
ए ) महाराणा प्रताप बी ) राणा सांगा सी ) महाराजा रणजीत सिंह डी ) शिवाजी . 
त्यात महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट पसरली आहे.


लेटेस्ट न्यूजसाठी तुमच्या व्हाटसअ‍ॅप वरुन  8625958636 ह्या नंबर वर Hi पाठवासंतोष शिंदे (संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हाध्यक्ष ) म्हणाले की कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात जानिवपुर्वक

उत्तरांच्या पर्यायांमध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा' उल्लेख 'एकेरी' शब्दात फक्त 'शिवाजी' हा करण्यात आलेला आहे. आणि यांचा आम्ही निषेध करतो.