काँग्रेस पक्षाला कॅल्शिअमचे इंजेक्शन दिले तरी काही उपयोग नाही ; ओवैसी

About Me

काँग्रेस पक्षाला कॅल्शिअमचे इंजेक्शन दिले तरी काही उपयोग नाही ; ओवैसी

pune asudding owaisi mim


पुणे:  काँग्रेस पक्षाला कॅल्शिअमचे इंजेक्शन दिले तरी काही उपयोग नाही कारण या पक्षात आता काहीच उरले नाही ,अशा शब्दात ओवैसी यांनी काँग्रेस पक्षावर टीका केली , विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सभा पार पडली त्यावेळी ते बोलत होते . पुण्याचे एमआयएमचे उमेदवार हिना मोमीन ,हडपसर विधानसभा मतदार संघाचे उमेदवार जाहिद शेख ,व वडगावशेरीचे उमेदवार डॅनिअल लांडगे हे उपस्तित होते . ओवैसी म्हणाले की  महाराष्ट्रात काँग्रेसची परिस्तिथी खूपच वाईट झाली आहे . पुढे ते म्हणाले की लोकशाही धोक्यात आली आहे ,भाजपाची सत्ता आल्यापासून मॉब  लिंचिंगच्या घटना प्रचंड वाढल्या आहे . व निर्दोष नागरिकांचा बळी  जात आहे , पण आपले माननीय पंतप्रधान प्रदेशात जाऊन हजारो नागरिकांसमोर जाऊन सांगतात की भारतात सर्व ठीक चालू आहे . 

आमच्यावर सत्ताधारी पक्षाकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहे ,व अशा प्रकारे ते आमचे आवाज दाबण्याचा काम करत आहे .