Motor Vehicles Act- कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे कडक नियम

About Me

Motor Vehicles Act- कार-बाइक चालवणाऱ्यांसाठी कायद्यात बदल, 'हे' आहेत नवे कडक नियम

moter vehicles act 2019

Motor Vehicles Act कायद्यात बद्दल , लोकसभेत मोटार वाहान कायद्याच्या सुधारनेला मंजूरी  मिळालीय. यात रस्ते सुरक्षेसाठी कड़क नियम तयार करण्यात आलेले आहे.जार तुम्ही ड्रायव्हिंग करताना छोटी चूक केली तरी  महागात पडू शकते, व त्या साठी तुम्हाला मोठा दंड दयावा लागू शकतो, अति वेग,विना हेलमेट ,ड्रिंक एंड ड्राइव ,याला मोठा दंड आकारला जाइल

मोटर वाहन कायदा 1988मध्ये बदल करून मोटर वाहन कायदा 2019 लोकसभेत मंजूर झाला.. या नव्या कायद्याप्रमाणे कारचं इंजिन योग्य नसलं तर कंपनीला 500 कोटींपर्यंत दंड आहे.मोटर वाहन कायद्यातले नवे नियम • धोकादायक पद्धतीनं गाडी चालवल्यास 5 हजार रुपयांचा दंड, यापूर्वी एक हजार रुपयांचा दंड आकारण्यात येत होता.

 • ओव्हरलोडिंगवर 20 हजार रुपयांचा दंड

 • नव्या कायद्यात दारू पिऊन कार चालवणाऱ्याला दंड 10 हजार रुपये आहे. अगोदर तो 2 हजार रुपये होता.

 •  रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही तर 10 हजार रुपये दंड

 • कार चालवताना मोबाइलवर बोलत असाल तर 5 हजार रुपये दंड आहे. अगोदर तो 1 हजार रुपये होता.

 • सीट बेल्ट न बांधल्यास एक हजार रुपये दंडात्मक कारवाई होईल. पूर्वी तो 100 रुपये होता.

 • रहदारीच्या नियमांचं उल्लंघन केल्यास आता 500 रुपयांचा दंड
 • वाहनांचा अनधिकृतरित्या वापर केल्यास 5 हजार रुपयांचं दंड, पूर्वी तो 500 रुपये होता

 • वर्षापेक्षा लहान वयाची व्यक्ती कार चालवत असेल तर कारचा मालक दोषी मानला जाईल. अशा वेळी 25 हजार रुपये दंड आणि 3 वर्षाच्या तुरुंगावासाची तरतूद आहे.

 • रस्त्याच्या चुकीच्या बांधणीमुळे अपघात झाला, तर ठेकेदारापासून संबंधितांवर कारवाई होईल. सहा महिन्याच्या आत नुकसान भरपाई मिळेल. कारच्या डिझाइनमुळे अपघात झाला, तर सर्व कार्स बाजारातून परत घेतल्या  जातील. कारच्या कंपनीला 500 कोटींचा दंड बसू शकतो.
 • अधिकाऱ्यांच्या आदेशाचं पालन न केल्यास 2 हजार रुपयांचा दंड

 • लायसन्स किंवा कार रजिस्ट्रेशनसाठी आधार नंबर आवश्यक आहे.

 •  लायसन्स संपलं तर तुम्ही नवं लायसन्स  वर्षभराच्या आत बनवू शकता. अगोदर 1 महिन्याच्या आत बनवावं लागायचं.

 • व्याजदर कमी झाले तरी 'या' योजनेत अजूनही दुप्पट होतात तुमचे पैसे

 •  इन्शुरन्सशिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला 2 हजार रुपये दंड पडेल.

 • बसमध्ये तिकिटाशिवाय प्रवास केलात तर 500 रुपये दंड पडेल.