औरंगाबाद मधे जय श्री राम न म्हणल्याने तरुणाला मारहाण

About Me

औरंगाबाद मधे जय श्री राम न म्हणल्याने तरुणाला मारहाण

mob lynching aurangabad mujaffar nagar hudco n13

औरंगाबाद: मधे गुरुवारी रात्री १२ वाजेच्या दरम्यान एका युवकास बळजबरी जय श्री राम बोलण्यास भाग पाडले ,
सविस्तर माहिती अशी की काही ८ -१० लोकांनी रस्त्यात एका मोटार सायकल चालक युवकास थांबवून त्याला मारहाण करुण जय श्रीराम' बोलण्यास भाग पाडले. ह्या संदर्भात बेगमपुरा पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली आहे .

जटवाडा रोड परिसरातल्या मुजफ्फरनगर निवासी इमरान इस्माइल पटेल हा औरंगाबाद मधल्या एका हॉटेल मधे काम करतो , गुरुवारी तो रात्री १२ वाजता हॉटेल वरुण  मोटारसायकलवर येत असताना त्याला एन-13 रोड वर  एक मोटारसायकल रस्त्यात आडवी दिसली, त्यामूळे तरुणाने तिथे उभे असलेल्या तरुनान्ना मोटार सायकल रस्त्यावरुण बाजुला कर अस सांगितल.इमरानला बघुम तिथले आठ -दहा तरुण एकत्र झाले , व त्यांनी इमरानच्या गाडीची किल्ली हिचकाऊन घेतली ,इमरानला त्यांनी शिवी-गाळ केली,व त्याला जय श्री राम बोल असे म्हणायला लागले ,इमरान ने जय श्री राम बोलण्यास नकार दिल्यामुळे त्याला जमावाने मारहाण केली.   त्याला बळजबरींने जय श्री राम बोलायला लावले ,घबर्ल्यामुळे तरुणाने जय श्री रामचे नारे लावले .


मारहाण होत असल्यामुळे इमरानने आरडा-ओरडा सुरु केला , आवाजामुळे आजू-बाजू चे लोक तेथे एकत्रित झाले , व गणेश भाऊ  व्यक्तिने इमरानला त्या जमावाकडून सोडविले आणि इमरानला घरी पाठविले, आणि दुसर्या दिवशी सकाळी इमरान ने बेगमपुरा पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली.देश्भारात मॉब लिंचिंग च्या घटना वाढत आहे , याच्यावर सरकारला चारकरण्याची गरज आहे.