शेळके प्रशाला येथे अविनाश मंडीखाबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

About Me

शेळके प्रशाला येथे अविनाश मंडीखाबे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्नअक्कलकोट (प्रतिनिधी) श्री एस एस शेळके प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अक्कलकोट तालुका अध्यक्ष अविनाश मंडीखाबे यांच्या 27 व्या वाढदिवसानिमित्ताने गरीब होतकरू विद्यार्थीना वही पुस्तक व शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य सुभाष आंदोडगी हे होते सिद्धार्थ सोशल फौंडेशन व के पी गायकवाड प्रतिष्ठान जीप चालक मालक संघटनेच्या वतीने सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.


 यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा सरचिटणीस प्रा.राहुल रुही , पीपल्स रिपब्लिकन पार्टी रोजगार आघाडी प्रदेश अध्यक्ष विकी बाबा चौधरी, शहर अध्यक्ष प्रसाद माने, सरपंच रफिक मुर्डी, सिद्धार्थ सोशल फौंडेशन संस्थापक कमलाकर सोनकांबळे, के पी गायकवाड प्रतिष्ठान अध्यक्ष शाम बाबर, राज यादव, महादेव सोनकवडे, धोंडूराज बनसोडे, सौ.शैलशिल्पा जाधव, निजप्पा गायकवाड, संदीप गायकवाड, राजू बगळे,आदी उपस्थिती होते.यावेळी बोलताना प्रा.राहुल रुही म्हणाले की आज ग्रामीण भागातील गरीब मुला मुलींना शिक्षण घेणे अवघड झाले आहे त्यामुळे आम्ही सिद्धार्थ सोशल फौंडेशन व के पी गायकवाड जीप मालक संघटनेच्या वतीने आम्ही गरीब 12 वी मध्ये शिक्षण घेत  असलेल्या पाच विद्यार्थ्यांना वार्षिक शैक्षणिक खर्च संस्थेच्या वतीने करण्यात येणार आहे.


 व पाचवीते दहावी पर्यत गरीब होतकरू विधार्थीना वह्या ,पुस्तक शैक्षणिक साहित्य वाटप आज आम्ही करीत आहोत असेच स्तुत्य उपक्रम आम्ही यापुढेही राबविणार आहोत यावेळी शेळके प्रशालामध्ये वृक्षारोपण करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल देशमुख, कुलकर्णी सर,  पंकज सुतार, परमेश्वर गायकवाड, शुभम मंडीखाबे, श्रीकांत गायकवाड, प्रकाश पोमाजी,उत्तम गायकवाड, विश्वनाथ करजगी, श्रीशैल माळी,अनिल पुरत, मुत्तु चिलमगेरी,अनिल सन्मुख, परमेश्वर मंडे, माणिक चिंचोळी, बाबुराव जवळकोटे, सिद्धार्थ सोशल फौंडेशन व के पी गायकवाड प्रतिष्ठान सर्व पदाधिकारी घेतले सूत्रसंचालन पुजारी सर यांनी केले आभार महादेव सोनकवडे यांनी केले.

आमच्या युट्युब चैनल ला सब्सक्राईब करा