ब्राह्मण समाज संघटनेला (BSOI) दणका देत आर्टिकल 15 या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे

About Me

ब्राह्मण समाज संघटनेला (BSOI) दणका देत आर्टिकल 15 या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे

article 15 movie

आर्टिकल 15 बॉक्स ऑफिसवर साध्य धुमाकुळ घालत आहे , परंतु सिनेमा रिलीजपासून या सिनेमाच्या विरोधात काही लोक आवाज उठवत आहे ,सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिल्याचा विरोध करत ब्राह्मण समाज संघटणा (BSOI)  ने सिनेमा विरुद्ध सर्वोच्च न्यायालयात तक्रार दाखल केलती, 


ब्राह्मण समाज संघटनेला (BSOI) दणका देत आर्टिकल 15 या चित्रपटाला सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.. ब्राह्मण समाज संघटनेने हा सिनेमा अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा दुरुपयोग करत असून यामुळे समाजात तेढ निर्माण होऊ शकते असं म्हणत याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायलायाने  फेटाळली आहे. ह्या सिनेमाचा ट्रेलर आल्यापासून ह्या सिनेमाचा विरोध होत होता,ह्या सिनेमाला बरयाच पैकी टीकेचा सामाणा करावा लागला, हा सिनेमा एक चांगला सिनेमा आहे , 


आर्टिकल सिनेमा मधे आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत आहे ,हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर चांगला प्रतिसाद मिळत आहे, ह्या सिनेमाने आतापर्यंत 50 कोटीहुन अधिक गल्ला जमवला आहे, आणि अजुन ही ह्या सिनेमाची मागणी कमी झालेली नाही आहे .